डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?, या प्रश्नासंदर्भात ‘कौन बनेगा करोडपती’वर एफआयआर
‘२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?’ हा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती-१२’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ३० ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात विचारला गेला. या प्रश्नामुळे अभिनेता अमिताभ बच्चन आणि केबीसी-१२च्या निर्मात्यांविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.......